पंचकर्म अंतर्गत केल्या जाणार्या विविध क्रिया:
आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र
50 खाटांची क्षमता व 24 तास अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध
श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर तपोभूमीत सदगुरु परमपूज्य मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि मेडीकल ट्रस्ट द्वारा अत्याधुनिक सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील, अत्यंत देखण्या वास्तुत आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्राचे श्री गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभहस्ते हजारोंच्या उपस्थितीत दि. 30 मार्च 2019 रोजी लोकार्पण करण्यात आले.
देही आरोग्य नांदते। भाग्य नाही यापरते॥
या उक्तीनुसार आपल्या शरीरात आरोग्य नांदावं, आपला प्रपंच व परमार्थ सुखकर व्हावा यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार श्रीगुरुप्रणित मार्ग गेल्या 70 वर्षांपासून सामान्य माणसाला दु:खमुक्त करून, हिंमत, धैर्य, दिलासा देऊन ग्राम व नागरी अभियानांतर्गत जनजागृती करून 20% अध्यात्म व 80% समाजसेवा याप्रमाणे कार्य करीत आहे. योग व आयुर्वेद ही दोन शास्त्रे नव्याने मुळ धरून वेगळ्याच स्वरूपात रुजण्यास सुरुवात झाली.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर

ठळक वैशिष्ट्ये :
- तब्बल 21 एकराच्या विस्तीर्ण परिसरात साकारलेले.
- अद्ययावत सुविधा असलेले आध्यात्मिक मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल
- निसर्गोपचार पध्दतीने आरोग्य प्रदान करणार्या अत्याधुनिक शल्यचिकित्सा व पारंपरिक चिकित्सेचा अनोखा संगम.
- प्रस्तावित सुविधा :- हृदय (कार्डिआक केअर), नेत्र (ऑफ्थॅलमॉलॉजी), किडनी (नेफ्रोलॉजी), कर्करोग (कॅन्सर), मेंदू (ब्रेनट्युमर, ऑन्कॉलॉजी इ.), बालरोग चिकित्सा (पेडियाट्रिक्स/निओ-नेटल/पोस्टनेटल केअर), स्त्रीरोग (गायनेकॉलॉजी), अपघात (ट्रॉमा केअर), वातव्याधी (ऑर्थोपेडिक्स, स्पॉन्डीलिटीस), मधुमेह, रक्तदाब, इ.
- एकूण 1000 हून अधिक बेडची क्षमता.
- आध्यात्मिक वातावरणात ‘दवा और दुवा’ या सेतूचा आरोग्यदायी मिलाफ.
- याशिवाय, एक परिपूर्ण नर्सिंग कॉलेज तसेच डॉक्टर व रुग्णांच्या नातेवाईकांकरिता
- निवास व भोजनाची व्यवस्था
रुग्णालयात उपलब्ध पंचकर्म सुविधा
अभ्यंग: स्नायू बलवान होतात, रक्तपुरवठा चांगला होतो, त्वचेला तेज येते.
स्वेदन: शरीराचा जडपणा कमी होतो, त्वचेवरील रंध्रे मोकळी होतात व विषद्रव्य बाहेर पडण्यास मदत होते. अतिरीक्त मेद कमी होतो.
शिरोधारा: डोकेदुखी, नेत्रविकार, ह्दयरोग, अनिद्रा, मानसिक आजार इ.साठी
वमन: जुनी सर्दी, पित्त, वंध्यत्व, हृदयरोग, मधुमेह, कर्करोग इ.साठी
पिंडस्वेद: वातविकार, वेदना व अशक्तता इ.साठी
विरेचन: पित्तविकार, रक्तविकार, त्वचाविकार, मलावरोध, संधिविकार, वंध्यत्व इ.साठी
बस्ती: वय:स्थापन, वर्ण, बल, आरोग्य, आयुष्य वृद्धीसाठी, सांधेविकार, पक्षाघात, वंध्यत्व, पी.सी.ओ.डी. इ.साठी
जानुबस्ती: गुडघेदुखी, गुडघ्यांची होणारी झीज आणि सध्याच्या काळात सातत्याने निर्माण झालेल्या गुडघे बदल आजारावर उपयुक्त
कटीबस्ती: मान, पाठ आणि मणक्यांचे सर्व आजारांसाठी उपयुक्त
ह्रदय बस्ती: ह्दयाच्या स्नायुंना बलशाली करते.
नस्य: जुनाट सर्दी, अर्धशिशी, शिर:शूल, नासा रोग, केस गळणे, चाई, अपस्मार, कर्णरोग इ.
रक्तमोक्षण: त्वचाविकार साठी उपयुक्त
नेत्रतर्पण: डोळ्यांचे विकारासाठी उपयुक्त
