आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र

50 खाटांची क्षमता व 24 तास अद्ययावत सेवा सुविधा उपलब्ध

श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर तपोभूमीत सदगुरु प.पू.मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल आणि मेडीकल ट्रस्ट द्वारा अत्याधुनिक सुविधांनी युक्त निसर्गरम्य वातावरणातील, अत्यंत देखण्या वास्तुत आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्राचे श्री गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊलींच्या शुभहस्ते हजारोंच्या उपस्थितीत दि. 30 मार्च 2019 रोजी लोकार्पण करण्यात आले.

देही आरोग्य नांदते। भाग्य नाही यापरते॥

            या उक्तीनुसार आपल्या शरीरात आरोग्य नांदावं, आपला प्रपंच व परमार्थ सुखकर व्हावा यासाठी परमपूज्य गुरुमाऊलींच्या आदेशानुसार श्रीगुरुप्रणित मार्ग गेल्या 70 वर्षांपासून सामान्य माणसाला दु:खमुक्त करून, हिंमत, धैर्य, दिलासा देऊन ग्राम व नागरी अभियानांतर्गत जनजागृती करून 20% अध्यात्म व 80% समाजसेवा याप्रमाणे कार्य करीत आहे. योग व आयुर्वेद ही दोन शास्त्रे नव्याने मुळ धरून वेगळ्याच स्वरूपात रुजण्यास सुरुवात झाली.

स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम्। आतुरस्य विकार प्रशमनम्॥

            या उक्तीप्रमाणे अर्थातच निरोगी देह/शरीर ही संकल्पना मनात ठेवली तर चरक, सुश्रुत, वाग्भट इ. आचार्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आयुर्वेदातील सर्वांसाठीची जिवनशैली, आजाराप्रमाणे नियोजित केलेली शमन व शोधन चिकित्सा, अर्थात औषधे व पंचकर्म यापद्धतीने विचार करून चिकीत्सा केली तर त्याचे परिणाम हे आपल्या वाढलेल्या प्रतिकार शक्तीत दृष्यमान होतात.

 आध्यात्मिक आयुर्वेदिक उपचार केंद्राची वैशिष्ट्ये :

1) सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज वास्तू

2) तब्बल 50 बेडचे आंतररुग्णालय

3) अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार उपचार

4) रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन सान्निध्यात नित्यसेवा, प्रसाद व तिर्थाचा लाभ

5) शारीरिकर्‍दृष्ट्या दुर्बल रुग्णांना बेडवर सर्व सुविधा

6) आयुर्वेद ग्रंथानुसार आहार-विहार सुविधा

7) रुग्णांना दिली जाणारी सर्व औषधी श्री स्वामी समर्थ गुरुपीठातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आयुर्वेद भवनात निर्माण होतात

8) आयुर्वेदिक औषधांसाठी लागणारी जडीबुटी, वनस्पतींची लागवड श्री गुरुपीठ निर्मित श्रीकृष्ण गोशाळा येथे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली होते

9) रुग्णांच्या दिर्घकालीन आरोग्यासाठी योगा- प्राणायाम, ध्यान-धारणेचे मुलभूत प्रशिक्षण उपचारादरम्यान दिले जाते

10) तब्बल 21 एकर परिसरातील श्रीकृष्ण गोशाळा आणि औषधी वनस्पती लागवड स्थानावर रुग्ण व नातेवाईकांच्या भेटी

11) दवा आणि दुवाचा मिलाफ साधून रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असणारे एकमेव आध्यात्मिक व आयुर्वेदिक उपचार केंद्र

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *